सिंगापूर
पर्यटकांचा आवडता देश. इथे ७६% चीनी १४% मलेशीयन तर ७% भारतीय आणि इतर
नागरीक वास्तव्य करतात. सर्व धर्मांचे सणवार ऊत्साहाने इथे साजरे होतात.
त्यातील ख्रिसमस आणि चीनी नववर्षदिन हे प्रमुख. त्या निमित्ताने देशभर केली
जाणारी रोषणाई केवळ अप्रतीम. ह्या वर्षी ३१ जानेवारीला चीनी नववर्षाची
सुरवात होते आहे.चंद्राला पृथ्वी प्रदक्षणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावर
नव वर्ष कधी सुरू होणार ह्याचं गणित आहे.त्यामुळे जानेवारीच्या अंतिम
पंधरवडया पासून ते फ़ेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवडयात कधीही ही तारीख येऊ
शकते.
वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ साजरा केला जाणारा हा
उत्सव.परंपरेनुसार १५ दिवसांचा.गेल्या वर्षी snake year होतं तर ह्या वर्षी
Horse year आहे.१२ प्राणी १२ वर्षांचं १ आवर्तन पूर्ण करतात. त्या विशई
अशी अख्याईका सांगीतली जाते की गौतम बुध्दा ने ज्या वेळी प्रुथ्वीवरील
प्राणीमात्रांची रजा घ्यायची ठरवलं त्या वेळी त्याने सर्वांना बोलावणं
धाडलं त्या वेळी हे १२ प्राणि त्याच्या भेटीस गेले.म्हणून त्यांची नावे
त्या वर्षांना दिली गेली.
सर्व नातेवाईक ह्या सणाच्या
निमित्ताने एकत्र येतात.घरं साफ़सुफ़ होतात.लहानांना आणि नवपरिणीत जोडप्यांना
लाल रंगाच्या पाकीटातून lucky coins(नाणी) देण्याचा रिवाज आहे. लाल रंग
शुभं मानला जातो. तसंच घरांमधे आणि दुकानांन मधे छोटया छोटया संत्र्यांनी
लगडलेली संत्र्यांची झाडं दर्शनी भागात ठेवण्याचीही प्रथा आहे.
सिंगापूर
मधे रोषणाई , आतषबाजी बरोबरच पारंपारीक लायन डान्सचही आयोजन ठीक ठीकाणी
होत.त्याचबरोबर चिंगे परेड ही सर्व धर्मी नागरिकांच संस्कृति प्रदर्शनचं
म्हणता येईल.त्या बरोबरच मरीना बे ला नदीकाठी एका मेळाव्याचही आयोजन होतं.
तर अशा ह्या उत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे.रोषणाई झाली आहे.त्याचीच ही काही
छायाचित्र खालील लिंक वर पहा
https://www.facebook.com/rajashri.s.lele

No comments:
Post a Comment